बिल गेट्स यांनी केली भविष्यवाणी; पहा करोना संपल्यावरही काय होईल म्हणतात ते

सध्या करोना कालावधीमुळे सगळीकडे वर्क फ्रॉम होम हे कल्चर खऱ्या अर्थाने रुजले आहे. कोविड १९ च्या साथीमुळे सेवा क्षेत्रातील आणि माहिती तंत्रज्ञान आधारित कंपन्यांनी हे नवे वर्क कल्चर आत्मसात केले आहे. करोना संपला तरीही अशाच पद्धतीने काम चालू राहील असे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांना वाटत आहे.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी लॉकेट ब्लूटूथ वायरलेस फ़क़्र रु. ७५०/-. घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

त्यांनी याचे फायदे सांगतानाच काही तोटे काय आहेत हेही सांगितले आहेत. बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, वर्क फ्रॉम होम अशावेळी अडचणीचे ठरते जेंव्हा आपल्या घरी लहान मुळे खूप त्रास देत असतात. किनवा अनेकदा घर छोटे असते तेंव्हाही नाही चांगले काम करणे शक्य होत. महिलांना तर अशावेळी घरातील काम जास्त पडत असल्याने त्यांच्या कामावर बराच परिणाम होतो.

मात्र, तरीही त्यांनी म्हटले आहे की, घरातून काम करण्याची सवय आता अनेकांना लागली आहे. एकूण स्टाफमधील २०, ३० किंवा ५० टक्के कर्मचारी कार्यालयातून आणि उरलेले घरातून काम करण्याची ही कार्यपद्धती भविष्यात राहण्याची शक्यता आहे. एकूणच जग या बदलासाठी सज्ज आहे असे बिल गेट्स यांना वाटत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here