पहा काय केलीय TIME मॅगझिनने मोदींवर टीका; मोदींसह बिल्किस बानोही TOP 100 मध्ये..!

जगभरातील माध्यम संस्था भारतीय नेते आणि येथील राजकारण याबाबत वेळोवेळी संदिग्ध भूमिका घेत असतात. आताही टाईम या सुप्रसिद्ध मासिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील महत्वाच्या १०० व्यक्तींमध्ये स्थान दिले आहे. मात्र, त्याचवेळी शाहीन बाग या आंदोलनातील बिल्किस बानो हिलाही त्या यादीत स्थान देण्यात आलेले आहे.

ADVT. ब्लूटूथ हेडफोन फ़क़्त रु. 499/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3307R8J लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

मोदी आणि बिल्किस बानो यांच्यासह गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक याचे सीईओ सुंदर पिचाई, बॉलीवुड हीरो आयुष्‍मान खुराना, एचआईवीवर शोध करणारे रविंदर गुप्‍ता यांचाही या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. मोदी यांच्यासह बिल्किस बानो यांचाही या यादीत समावेश झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आपल्या ताज्या अंकात ई यादी मासिकाने प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, मागि ७ दशकांमध्ये भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून स्थान टिकवून आहे. इथे फ़क़्त निवडणुका होऊन कोण विजयी होतोय हे महत्वाचे नाही. तर, विरोधात मतदान केलेला घटकही तितकाच महत्वाचा आहे. १३० कोटी लोकसंख्येत इथे सर्व धर्मीय राहतात.

ADVT. दाढी कोरण्याचे (बिअर्ड ट्रीमर) फ़क़्त रु. 555/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3hUNTQI लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

त्यांनी त्यामध्ये टीका करताना लिहिले आहे की, यापूर्वीही सर्वजण हिंदू समुदायाचे नेते पुढे आलेले आहे. त्यांनी देशाचे प्रमुख पद भूषवले आहे. मात्र, एकांगी वागणूक कोणीही दाखवली नाही. मुस्लीम समुदायाला सध्या वेगळी वागणूक दिली जात आहे. महामारी म्हणजे असंतोष दाबण्यासाठीचा घटक बनली आहे. एकूण भाजपच्या कार्यकाळात जगात सर्वाधिक सजग आणि जिवंत वाटणारी लोकशाही सध्या संकटात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here