टॉप 100 मध्ये नरेंद्र मोदी; पहा काय म्हटलेय TIME मासिकाने त्यांच्याबद्दल

जगातील प्रभावी १०० व्यक्तींची यादी जगप्रसिद्ध टाईम मॅगझिन यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये त्यांनी भारताचे एकमेव राजकीय व्यक्ती समाविष्ठ केले आहेत. अर्थातच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. या मासिकाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांचाही या महत्वाच्या यादीत समावेश केला आहे.

ADVT. ब्लूटूथ हेडफोन फ़क़्त रु. 499/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3mLViWg लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात स्पेशल फिचर प्रसिद्ध करून या मासिकाने मोदी आणि भाजप यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे देशभरातून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आताही त्यांनी या यादीत समावेश करताना मोदींच्या बाबतीत तारीफ के पूल बांधताना म्हटले आहे की, अनेक दशकांपासून देशात एकोप्याचे बीज रोवण्यात मोदींना खऱ्या अर्थाने यश आलेले आहे. त्यांनी धार्मिक अल्पसंख्याक मंडळींना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले आहेत.

हे झाल्यावर मासिकाचे एडिटर कार्ल विक यांनी लिहिले आहे की, लोकशाहीत विजेता नाही तर मतदार महत्वाचा असतो. त्यातही विजेत्यांच्या बाजूने मतदान न केलेले खूप महत्वाचे असतात. त्याचवेळी गंभीर महामारी ही भाजपच्या सत्तेने लोकांचा असंतोष दाबण्यासाठी वापरली आहे. हेही या देशात घडले आहे. त्यांनी आरोप करताना त्या लेखात भाजपने देशातील बहुलतावाद खतम केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचे मोदींच्या बाबतीत केलेले हे वाक्य खटकले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here