महाराष्ट्राच्या सर्वात जास्त लाडक्या सुनेचा आज वाढदिवस; वाचा त्यांच्याविषयीचा हा भन्नाट लेख

गावाकडे गणपतीच्या दिवसात गणपती समोर मोठ्या संख्येने चित्रपट दाखवण्यात यायचे. त्या वेळी “माहेरची साडी” नावाचा चित्रपट दाखवण्यात येणार आहे अशा चर्चा जरी महिलांच्या कानावर पडल्या तरी फुल्ल गर्दी व्हायची. प्रत्येक सासुरवाशीण, प्रत्येक सून, डोळ्यांना पदर लावून ढसा ढसा रडत चित्रपट पहायची. माझं सगळं दुःख आहे असच या चित्रपटा मध्ये उतरवले आहे असे वाटायचे. महिना महिना, दोन दोन महिने महिलांच्या डोक्यातून या चित्रपटाची हवा निघालेली नसायची. ज्या घरात टीव्ही नाही, केबल नाही, किंवा चित्रपट पाहायला मिळावा असे साधन उपलब्ध नाही पण गावागावातील कुटुंबातील एका तरी महिलेने “माहेरची साडी” हा चित्रपट पाहिलाच आहे. यावरूनच चित्रपटाची लोकप्रियता लक्षात येते. 

ADVT. ब्लूटूथ हेडफोन फ़क़्त रु. 499/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3307R8J लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त अन्याय झालेली सासुरवाशीण असलेली सून म्हणजे अलका कुबल असं म्हणलं तरी काय बिघडणार नाही. एखादी कलाकृती एखाद्या कलाकाराची कायमस्वरूपीची ओळख होऊन जात असते. सर्वाधिक शोषक महिला पात्र म्हणून अलका कुबल यांना महिलांच्या मध्ये ओळखले जाते. त्यांच्या अभिनयाचे मोठेपण म्हणावं लागेल की याच अभिनयाच्या जोरावर त्यांनी लोकांच्या मनावर एक काळ राज्य केलं. अजुन पण त्यांच्या या चित्रपटाची चर्चा अधून मधून सुरू असतेच. 

सासर आणि माहेर असा संघर्ष असणारी लाट मराठी चित्रपट सृष्टी मध्ये त्यांनी आणली यावरून त्यांच्या अभिनयाच्या बाबतीत आपल्याला निश्चित अंदाज येतो. अलका कुबल यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म हा २३ सप्टेंबर १९६३ रोजी मुंबई मध्ये झाला. त्यांचा लहानपणी पासून अभिनयाच्या क्षेत्रात वावरत होता. त्यांनी नटसम्राट सारख्या नाटकात बालकलाकार म्हणून  तब्बल २५० प्रयोग केले. त्यांनी चित्रपट सृष्टी मध्ये अण्णासाहेब देऊळकर यांच्या लेक चालली सासरला या सिनेमातून पाऊण ठेवले. हुंडा आणि त्याचे परिणाम यावर आधारित असलेला हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाला. त्यांची या चित्रपटाच्या नंतर जी गाडी सुसाट निघाली ती कधी थांबलीच नाही. 

मराठी मधील सुप्रसिद्ध अशा अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक : गणेश शिंदे सरकार   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here