फ़क़्त १ रुपयात घ्या गाडी; पहा कोणत्या बँकेने डेबिट कार्डवर आणलीय ही भन्नाट स्कीम

पहिलीच दुचाकी गाडी नवीन घेण्याचा किंवा आपली जुनी गाडी विकून नवीन घेण्याचा विचार करीत असल्यास आपण ही बातमी नक्कीच वाचा. कारण, फ़क़्त १ रुपयात तेही डेबिट कार्डवर थेट नवीन दुचाकी गाडीचे कर्ज देण्याची नवी स्कीम बँकेने सुरू केली आहे.

ADVT. ब्लूटूथ हेडफोन फ़क़्त रु. 499/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3mLViWg लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

बातमी वाचताय आणि लगेचच खिशातले डेबिट कार्ड काढून गाडी घ्यायला जाण्याचा विचार करत असल्यास आणखी पुढेही वाचा. सध्या ही स्कीम फ़क़्त फेडरल बँक यांनीच सुरू केली आहे. मात्र, आता ही एकाची स्कीम आलीय म्हटल्यावर इतर बँकही अशाच पद्धतीच्या स्कीम आणण्याची शक्यता आहेच की.

यासाठी जास्त काहीही करावे लागत नाही. आपल्याकडे बँकेचे डेबिट कार्ड असावे लागते. त्यावर आपण गाडी घेऊन शकतो की नाही हे तपासण्यासाठी “DC -स्‍पेस- EMI” हे लिहून ‘5676762’ यावर SMS पाठवून द्या किंवा ग्राहक हे सगळे करू शकत नसल्यास रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबरवरून ‘7812900900’ यावर मिस्ड कॉल हाणा. मग आपल्याला तुम्ही या स्कीमसाठी पात्र आहात किंवा नाही हे समजेल.

ADVT. दाढी कोरण्याचे (बिअर्ड ट्रीमर) फ़क़्त रु. 555/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3hUNTQI लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

हीरो मोटोकॉर्प, होंडा मोटरसाइकिल आणि TVS मोटर यांच्या गाड्या याद्वारे आपण फ़क़्त १ रुपयात घेऊ शकता. ३, ६, ९ आणि १२ महिन्याचा EMI करून घेऊन आपण ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता. यावर एका कार्डावर ५ टक्के म्हणजे किमान ५००० रुपये कॅशबॅंक मिळण्याचीही सोय आहे. ३० हजार रुपयांच्या अधिकच्या रकमेसाठी ही स्कीम लागू असणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here