‘कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार’ म्हणत ‘या’ भाजप नेत्याने साधला सुप्रिया सुळेंवर निशाणा

मुंबई :

कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार यांनी आपल्याला इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस आल्याचा दावा केला होता. अशी कोणतीही नोटिस पाठवली नसल्याचे आज इनकम टॅक्स विभागाने स्पष्ट केले आहे, असे म्हणत भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर टीका केली आहे.

‘सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस’, असे म्हणत भातखळकर यांनी पवारांसह सुप्रिया सुळे यांनाही टोला लगावला. भातखळकर यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कुणाल यांनी म्हटले आहे की, आम्हाला सुद्धा सांगा १० एकरात ११३ कोटी रुपयांची वांगी लागवड कशी करावी. वांगी ही इटली जातीची आहेत हे सांगू नका म्हणजे झालं.

ADVT. ब्लूटूथ हेडफोन फ़क़्त रु. 499/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3307R8J लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

या दरम्यान भातखळकर यांनी मुंबईतपावसामुळे झालेल्या अडचणी लक्षात घेत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली.

एवढे सगळे होऊनही ते ‘घरी’च आहेत, असाही टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना हाणला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here