म्हणून शेतकरी संघटनेने केले विखेंच्या लोणीत राखरांगोळी आंदोलन; पहा काय म्हटलेय त्यांनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी उठवावी यासाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याअंतर्ग प्रत्येक खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन जाहीर केले होते. लोणी (जि. अहमदनगर) येथेही खासदार सुजय विखे यांच्या गावात शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

ADVT. ब्लूटूथ हेडफोन फ़क़्त रु. 499/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3mLViWg लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

याबाबत माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले की, निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकसभेत आवाज उठवण्याची गरज आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करण्याकडे त्यांचे लक्ष वेधावे यासाठी खासदारंच्या दारात निर्यातबंदी आदेशाची जाळुन राख करण्यात आली. तसेच कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन आज शेतकरी संघटनेने केले.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष घनवट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे आंदोलक खासदार डॉ. सुजय विखे यांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना घराकडे जाण्यापासून रोखले. त्यानंतर आंदोलकांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतुळ्यासमोर राखरांगोळी आंदोलन करून आपली भावना आणि निषेध व्यक्त केला.

ADVT. दाढी कोरण्याचे (बिअर्ड ट्रीमर) फ़क़्त रु. 555/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3hUNTQI लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

या आंदोलनात उत्तर नगरचे संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब आढाव, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, अनिल भुजबळ, महादू खामकर, मधुकर शिंदे, नानासाहेब जाधव, निलेश शेडगे, जितेंद्र शहा, अंबादास चव्हाण, बन्सी इंगळे, दत्ता वाळुज, दत्तात्रय जाधव आदि कार्यकर्ते सहभागी झाले.

घनवट म्हणाले की, खासदार जर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकसभेत आवाज उठवणार नसतील तर त्यांना शेतकरी पुन्हा निवडुन देणार नाहीत. जो पक्ष कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करेल व जो पक्ष कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी करेल अशा पक्षांना शेतकर्‍यांनी या पुढे मतदान करू नये. कांद्याचे भाव पाडण्यासठी निर्यतबंदी व कांद्याची आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा शेतकरी संघटनेने निषेध केला.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here