म्हणून सुबोध भावे सोडताहेत ट्वीटर; वाचा, काय म्हटलेय चाहत्यांनी

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आता ट्वीटर सोडणार असल्याचे त्यांनी स्वतः ट्वीट करत कळवले आहे. सुबोध यांनी केलेल्या या ट्वीटनंतरही लोकांनी त्यांना ट्रोल केले आहे. काही चाहत्यांनी त्यांना समर्थनही दिले आहे. ‘आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र’, असे म्हणत त्यांनी ट्वीटर सोडण्याचे जाहीर केले.

सुबोध यांच्या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अनघा आचार्य यांनी म्हटले आहे की, का? चूकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या टाळण्यापेक्षा सुधरा किंवा दुर्लक्ष करा. परंतु तुमचे ट्विटर फॉलोअर्स निखळ प्रेम करतात त्यांना का शिक्षा?

अभिजित औताडे यांनी म्हटले आहे की, अकाऊंट डिलीट करणे एक पळपुटेपणा वाटतो सर. तुमच्या मनाला माहितीये ना तुम्ही चुकलेले नाहीत मग अकाऊंट का डिलीट करायचे आणि बिनकामाच्याच रिकामे ट्रोल करणारयांना काय किंमत द्यायची. सर उद्या एखाद्याने सांगितले कि तुमची ऐक्टिंग आता चांगली नाही मग ऐक्टिंग पण सोडणांर का?    

ADVT. ब्लूटूथ हेडफोन फ़क़्त रु. 499/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3mLViWg लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

सातत्याने तसेच विनाकारण होणाऱ्या ट्रोलमुळे वैतागून सुबोध भावे ट्वीटर सोडत आहेत, असे प्रथमदर्शनी दिसते. कारण त्यांच्या या ट्वीटर सोडण्याच्या ट्वीटवर सुद्धा काही लोकांनी त्यांना ट्रोल केले आहे. मराठी अस्मिता आणि मुंबई स्पिरीट असे ट्रोल करणारांचे मुद्दे आहेत. तर काही जन पुरोगामी-प्रतीग्रामी या मुद्द्यांवर बोलत आहेत. नेमकं भावे यांनी का ट्वीटर सोडले ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here