म्हणून एसपी ग्रुप विकणार आहे टाटा सन्समधील हिस्सा; पहा नेमकी काय आहे यामागची गोष्ट

मागील चार वर्षांपासून टाटा ग्रुप आणि शापोरजी पालोनजी ग्रुप (एसपी ग्रुप) यांच्यातील तणावाबाबत वेळोवेळी अनेक बातम्या येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता शेअर धारकांच्या हिताला प्राधान्य देऊन टाटा सन्समधील १८. टक्के हिस्सा विकण्याची तयारी एसपी ग्रुपने केली आहे. त्यांनी याबाबतची आपली भूमिका जाहीर केली आहे.

ADVT. दाढी कोरण्याचे (बिअर्ड ट्रीमर) फ़क़्त रु. 555/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3hUNTQI लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

एसपी ग्रुप सध्या आपल्याकडील टाटा सन्स यांचे शेअर गहाण ठेऊन आपल्यावर असलेला कर्जाचा भाग कमी करण्याच्या विचारात आहे. याला टाटा ग्रुपने हरकत घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. ऑक्टोबरपर्यंत याच्या पुढील सुनावणीपर्यंत हे शेअर गहाण न ठेवण्याच्या सूचना आल्याने आता एसपी ग्रुपने आपली भूमिका जाहीर केली आहे.

२०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून कधुअन टाकण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. तेंव्हापासून याबाबतीत असलेला तणाव वाढत आहे. अशावेळी आता शेअर धारकांचे हित लक्षात घेऊन आपल्याकडे असलेला हिस्सा विकून टाकण्याची तयारी एसपी ग्रुपने केली आहे. त्यांना या सौद्यातून किमान १.७८ लाख कोटी रुपये मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यांच्यातील चर्चेच्या फेऱ्यातून यावर कोणता निर्णय अंतिम होतो याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here