मराठी इंडस्ट्रीतही कोरोनाचा शिरकाव; अग्गबाई सासूबाई या मालिकेतील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री झाली कोरोनाबाधित

मुंबई :

मराठी चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आता वाढत आहे. नुकतेच जेष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. अशातच मराठी इंडस्ट्रीतून एक बातमी समोर आली आहे. ‘आग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ या कोरोनाबाधित झाल्या आहेत.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या शुटींगच्या दरम्यान मालिकेतील तब्बल २७ मेम्बर्सला कोरोना झाला होता. मुंबईहून आलेल्या एका डान्सच्या टीममधील लोकांमुळे या मालिकेतील मेम्बर्सला कोरोना झाल्याचे बोलले जात होते. अशातच मराठी इंडस्ट्रीत कोरोनाने शिरकाव केला असून आता बाधितांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान निवेदिता सराफ यांची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्यानं त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

अनेक वर्षांनंतर निवेदिता सराफ या छोट्या पडद्याकडे वळल्या होत्या. पहिल्याच टप्प्यात त्यांना मिळालेल्या ‘आग्गबाई सासूबाई’ मालिकेमुळे त्यांचे नाव पुन्हा नव्या माध्यमातून घराघरात पोहोचले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here