अदानी अॅग्री लॉजिस्टिक येतेय शेतकऱ्यांच्या सेवेत; पहा कोणते तंत्रज्ञान घेऊन येतेय कंपनी ते

देशभरात कृषी सुधारणा विधेयकांवर घमासान सुरू आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना कसा फायदा होणार याचे दाखले दिले जात आहेत. तर, दुसरीकडे यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे बाजार स्वातंत्र्य अधोरेखित केले जात आहे. अशावेळी सुप्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या समूहाची अदानी अॅग्री लॉजिस्टिक लिमिटेड ही कंपनी शेतकरी सेवेसाठी दाखल होत आहे.

याबाबतची एक जाहिरात सध्या सोशल मीडियामध्ये शेअर होत आहे. कंपनी शेतकऱ्यांना देणार असलेल्या सेवा ई त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात होणार असलेले महत्वपूर्ण बदल याबाबतीत सुप्रसिद्ध सिने अभिनेता अतुल कुलकर्णी या जाहिरातीत माहिती देत आहेत. फ्युचर ऑफ फूड सिक्युरिटी इन इंडिया अशी या कंपनीची थीम आहे. २.२० मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. देशभरात ही कंपनी ६५० कोटी रुपये इतकी मोठी गुंतवणूक करणार आहे.

ADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

मोघा (पंजाब) आणि कैथल (हरियाना) येथे बेस डेपो याद्वारे उभारले जात आहेत. फिल्ड डेपो चेन्नई, कोइम्बतुर, नवी मुंबई, बेंगलोर आणि हुबळी येथे सुरू होत आहेत. इथे तंत्रज्ञान आणि आधुनिक सिस्टीम यांच्या मदतीने सायालोजमध्ये अन्नधान्य साठवून आहे त्याच फ्रेशनेससह त्याचे वितरण केले जाणार आहे. बेस डेपो इथे शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी केली जाणार आहे. इथे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल असे त्या जाहिरातीत म्हटले आहे.

अशा पद्धतीने या जाहिरातीत कंपनी शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी काश पद्धतीने तयारीत आहे याचीच माहिती दिलेली आहे. एकूणच पुढील काळात साठवणूक आणि वाहतूक या दोन्ही टप्प्यांवर मोठ्या प्रमाणात होणारी अन्नाची नासाडी थांबणार आहे. यावरून काहीजण आता ही जाहिरात ट्रोल करीत आहेत. मात्र, देशाच्या एकूण भविष्यासाठी याची खूप गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने यापूर्वीचे हे अधोरेखित केल्याने हा महत्त्वपूर्ण बदल होणार आणि त्याचा लाभही देशाला मिळणार आहे. त्याबाबतची माहिती देण्याचा हा प्रयत्न. आपणही ही जाहिरात पाहून घेऊन शेतकऱ्यांच्या जीवनात येणाऱ्या क्रांतीची माहिती घ्या.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here