म्हणून राज्यसभेत उपस्थित राहिलो नाही; कृषी विधेयकाच्या मुद्द्यावर उपस्थित नसल्याने दिले हे कारण

कृषी विधेयकाचे घमासान चालू असताना राज्यसभेत शरद पवार अनुपस्थित होते. तसेच त्यावेळी त्यांच्या पक्षाने मतदानात भागही घेतला नव्हता. त्यावर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले आहे. हे अपील लवकरात लवकर करण्याची आवश्यकता होती. कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः तरुण पिढीमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी अस्वस्थता आहे. या कामासाठी मला राज्यात थांबावं लागल्यामुळे राज्यसभेत हजर राहता आले नाही.

ADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

राज्यसभेत कृषिविषयक दोन-तीन विधेयके सादर होणार होती. त्यावर तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा होती. मी टीव्हीवर सभागृहाचे संपूर्ण कामकाज पाहात होतो. ही विधेयके तातडीने मंजुर करून घ्यावीत या प्रकारचा सत्ताधारी पक्षाचा आग्रह असल्याचे त्यात निदर्शनास आले. हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे सदनातील काही सदस्य नियमांच्या पुस्तकाचा आधार घेऊन, त्या नियमांचा उल्लेख करून माननीय उपाध्यक्षांना सांगत होते. असे असतानाही सदस्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here