राज्यसभेत कृषी विधेयकाच्या मतदान प्रक्रियेत भाग घेणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने टाळले होते. त्यावर कोणतीही ठोस बाजू न मांडता ते विधेयक केंद्र सरकारने कसे तातडीने मंजूर करून घेतले हा मुद्दा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी अधोरेखित केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, राज्यसभेत कृषिविषयक दोन-तीन विधेयके सादर होणार होती. त्यावर तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा होती. मी टीव्हीवर सभागृहाचे संपूर्ण कामकाज पाहात होतो. ही विधेयके तातडीने मंजुर करून घ्यावीत या प्रकारचा सत्ताधारी पक्षाचा आग्रह असल्याचे त्यात निदर्शनास आले. या कृषि विधेयकांसंदर्भात राज्यसभेतील सदस्यांना काही प्रश्न, शंका आणि मतं व्यक्त करायची होती आणि त्यासंबंधीचा आग्रह त्यांनी धरलेला होता. हा आग्रह बाजूस ठेवून सदनाचं काम पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न असावा असं प्रथमदर्शनी त्याठिकाणी दिसून येत होतं. तरुण पिढीमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी अस्वस्थता आहे. या कामासाठी मला राज्यात थांबावं लागल्यामुळे राज्यसभेत हजर राहता आले नाही.
ADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.
तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की, हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे सदनातील काही सदस्य नियमांच्या पुस्तकाचा आधार घेऊन, त्या नियमांचा उल्लेख करून माननीय उपाध्यक्षांना सांगत होते. असे असतानाही सदस्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली. नियमांचे पुस्तक पुन्हा पुन्हा दाखवूनही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याने ते नियमांचं पुस्तक फाडण्याचा प्रकार घडला. कमीत कमी खासदार कोणता नियम सांगत आहेत हे ऐकून घ्यावे,अशी अपेक्षा माननीय उपाध्यक्षांकडून होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून तातडीने मतदान घेण्याची भूमिका घेतली गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर त्यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मतदानदेखील आवाजी पद्धतीने घेऊन ही विधेयके मंजूर केली गेली. साहजिकच सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. या प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता होती. सदस्यांना त्यांची मते मांडण्याची संधी देणं आवश्यक होतं. पण हे संसदीय संकेत पाळले गेले नाहीत. मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात व देशाच्या संसदेत सतत ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. परंतु पीठासीन व्यक्तींकडून याप्रकारचे वर्तन मी कधी पाहिलेले नाही. मला आणखी एका गोष्टीचा धक्का बसला की, बिहारमधील कर्पुरी ठाकूर या अत्यंत ज्येष्ठ तसेच संसदीय व लोकशाही पद्धतीचे जाणकार असलेल्या नेत्यांच्या विचाराने माननीय उपाध्यक्ष चालतात असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने त्या सगळ्या विचाराला तिलांजली देण्याचे काम राज्यसभेत त्यांच्याकडून झालं आहे. हा सगळा घटनाक्रम घडत असताना काही सदस्यांनी मतं व प्रतिक्रिया तीव्रपणे व्यक्त केली. त्यावर लगेच कारवाई करून काही सदस्यांचे अधिकार हिरावून घेतले. ते सदस्य प्रतिक्रिया म्हणून संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश करण्यासाठी काल संध्याकाळपासून उपोषण व धरणं धरून बसले आहेत.
संपादन : सचिन पाटील