रोहित पवारांनी सरकारला केले ‘हे’ आवाहन; मराठा आरक्षणाबाबत म्हटलेय की..

मराठा आरक्षण हा पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महत्वाचा मुद्दा बनला आहे. न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडण्यात सरकारी वकिलांना आलेल्या अपयशामुळे यंदाचे आरक्षण मिळणार नसल्याची भावना आता आणखी तीव्र होत आहे. त्याकडे लक्ष वेधताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला आवाहन केले आहे.

ADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या सवलती मराठा समाजासाठीही लागू केल्याबद्दल आणि आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवांच्या वारसांना ST मध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल #MVA सरकारचे मनापासून आभार.आता आरक्षणाचा निर्णय लवकर व्हावा,यासाठी सरकारने न्यायालयात ताकद लावावी,ही विनंती.

त्यावर सचिन पाटील यांनी एमपीएससी परीक्षेचा दाखला देऊन म्हटले आहे की, दादा, लवकरात लवकर मुलाखतीचे कार्यक्रम जाहिर करावे यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती, आता तरी मला उत्तर मिळेल ही अपेक्षा करतो. तर, वैभव नरवडे यांनी म्हटले आहे की, आधी आरक्षण आणि मगच भरती! हीच मराठा समाजाची भूमिका आहे.

संपादन : गणेश शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here