काश्मीर मुद्द्यावर भारताने घेतलेल्या प्रखर भूमिकेमुळे आता तिथे शांतता आहे. हीच शांतता भंग करण्यासाठी आणि भारतात पुन्हा एकदा धार्मिक असंतोष वाढवण्यासाठीचे प्रयत्न पाकिस्तानकडून चालू झालेले आहेत. अशावेळी पाकिस्तानचा आणखी एक मित्र देश त्यामध्ये मदतीला उतरला आहे.
ADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.
एकेकाळी शंभर वर्षांपूर्वी धार्मिकता सोडून धर्मनिरपेक्ष बनलेल्या तुर्कास्थान या देशामध्ये सध्या धार्मिक कट्टरता वाढत आहे. तेथील राष्ट्रपति रेचप तैय्यप एर्दोगान यांनी तुर्की देशाला पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट बनवण्यासह जगभरातील इस्लामिक देशांचा मसीहा म्हणवून घेण्यासाठीचा अट्टाहास धरला आहे. त्याचा एर्दोगान यांनी आता काश्मीरच्या मुद्यात नाक खुपसले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा ज्वलंत मुद्दा एकदाचा सोडवायला हवा.
- जगातील ‘हे’ 3 महाराजे होते भलतेच प्रसिध्द; ‘विचित्र’ गोष्टींसाठी खर्च करायचे पाण्यासारखा पैसा
- कोट्यावधी रुपयांचे मालक असलेले ‘हे’ 5 क्रिकेटर्स आहेत फक्त 10 वी किंवा 12 वी पास; इतर नावे वाचून व्हाल शॉक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
हे फ़क़्त बाहेर न म्हणता संयुक्त राष्ट्राच्या महासभेतही काश्मीर मुद्दा मांडण्याची आगळीक त्यांनी केली आहे. त्यावर भारतीय प्रतिनिधि पीआर यूएन कृष्णमूर्ति यांनी तुर्कीला सुनावले आहे. मात्र, हिंदुस्तान टाईम्स या आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार तुर्कस्थान हा देश आता भारतात सक्रियपणे नाक खुपसत आहे. येथील शांतता धोक्यात आणण्यासह पाकिस्तानच्या मदतीला एर्दोगान यांचा हा देश सरसावला आहे.
भारतातील अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोसण्याची जबाबदारी तुर्कीने घेतली आहे. त्यामुळे आता हा देशही भारताच्या विरोधात कृत्य करणाऱ्यांच्या यादीत गेला आहे. भारतातील इस्मालिक कट्टरपंथी मंडळींना या देशातून पैसे आणि इतर मदत येत असल्याचे हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीत म्हटलेले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे