कोरोनाचे ‘ते’ नियम मोडल्यामुळे राज ठाकरेंनी भरला ‘एवढा’ दंड

मुंबई :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना दरम्यानचे नियम मोडल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला आहे. यापूर्वीही एकदा राजकीय बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी मास्क न लावल्यामुळे त्यांना माध्यम प्रतिनिधींनी टोकले होते. तेव्हाही त्यांनी ‘बाकीच्यांनी मास्क लावला होता म्हणून मी नाही लावला’ असे उत्तर दिले होते.

राज ठाकरे आपल्या कुटूंबीयांसह मुंबई ते मांडवा असा बोटीने प्रवास करत होते. रो-रो फेरी बोटीने अलिबागला प्रवास करताना त्यांनी मास्क वापरला नाही. या प्रवासात त्यांच्यासह माजी आमदार व मनसे नेते नितीन सरदेसाई होते. रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करू नये आणि मास्कचा वापर करावा, अशा सूचना सातत्याने दिल्या जात होत्या. प्रवासाच्या नादात राज ठाकरेंचे सूचनांकडे दुर्लक्ष झाले असावे. त्यामुळे त्यांनी मास्क लावला नाही. नंतर त्यांनी सिगारेटही शिलगावली. नंतर बोटीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना ही बाबलक्षात आणून दिली.

आपली चूक झाली आहे, हे लक्षात येताच राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करत हजार रुपये दंड भरला.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here