कृषी सुधारणा विधेयकांमुळे उत्पन्न दुप्पट होईल; ‘त्या’ मुद्द्यांवर FAIFA ला वाटतोय विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल असाच आरोप शेतकऱ्यांच्या संघटनांकडून केला जात आहे. त्याचवेळी अखिल भारतीय परिसंघ (FAIFA) यांनी हे विधेयक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यसभेत विरोध असल्याचे सांगणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी प्रत्यक्षात मतदानात भागच घेतला नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांची या विधेयकावरील भूमिका कोणती खरी हाच प्रश्न पडला आहे. कॉंग्रेसने हे विधेयक कॉर्पोरेट धार्जिणे असल्याचे म्हटले आहे. तर, भाजपने हे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे विधेयक असल्याचे म्हटले आहे. असह पद्धतीने यावर राजकारण जोमात आहे.

ADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

त्याचवेळी FAIFA संघटनेने मात्र, हे शेतकऱ्यांना मोठी मदत करणारे विधेयक असल्याचे म्हटले आहे. ही संघटना आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक आणि गुजरात राज्यातील व्यावसायिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करते. त्यांनी म्हटले आहे की, यामुळे शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतील. त्यामुळे अशा स्पर्धात्मक वातावरणात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल.

पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोधी होत आहे. हे सर्व शेतकरी मोठे असल्याचे काही माध्यम संस्थांनी बातमीत म्हटले आहे. एकूणच यामुळे हमीभाव आणि शेतकऱ्यांना तक्रार करून हक्क मिळवण्याचा हक्क कसा मिळणार यावर मात्र कोणीही योग्य प्रकाशझोत टाकलेला नाही. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या पद्धतीने आश्वस्त करतात याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here