अबबब ५ वर्षात मोदींनी केले ५८ देशांचे दौरे; झालाय ‘एवढा’ खर्च

दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर नेहमीच टीका होत असते. स्वतःच्या सेल्फी प्रमोशनसाठी मोदी परदेश दौरे करतात, असेही विरोधकांचे म्हणणे आहे. दरम्यान आता संसदेत चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एका खासदाराने मोदींच्या विदेश दौर्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, २०१५ पासून पंतप्रधान मोदींनी एकूण ५८ देशांचे दौरे केले आहेत. यासाठी एकूण ५१७.८२ कोटी रुपये खर्च झाला असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

ADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत दिलेली माहिती पुढीलप्रमाणे :-

१)     मोदींनी या दौऱ्यांमध्ये अनेक देशांशी महत्त्वाचे करार केले.

२)     व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि इतर मोठ्या क्षेत्रांशी सबंधित करार केले.

३)     आर्थिक विकासाच्या अजेंडावर राष्ट्रीय मोहिमांचा विस्तार केला.

कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून मोदींनी एकही विदेश दौरा केलेला नाही. कोरोनाच्या दरम्यान परराष्ट्र मंत्री, नेत्यांशी संवाद साधण्यासाठी मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यम वापरत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here