हेलीकॉप्टरमधून उतरून शेती करणारे शेतकरी आता कुठे गेले; ‘या’ कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

मुंबई :

मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यावर लोकांनी अक्षरशः सडकून टीका केली होती. हातात भारा बांधलेला असा तो फोटो होता. ज्यावरून लोकांनी हे नाटकी आहे, फोटोपुरते आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. तोच फोटो समोर आणत ‘हेलीकॉप्टरमधून उतरून शेती करणारे शेतकरी आता कुठे गेले’? असा सवाल कॉंग्रेस नेते व माजी आमदार भाई जगताप यांनी उभा केला आहे.    

नव्याने आणलेल्या शेतकरी विधेयकावरून त्यांनी ही टीका केली आहे. तसेच त्यांनी या शेतकरी विधेयकासबंधित ईतरही काही प्रश्न उपस्थित करत काही मागण्या केल्या आहेत.

  • १) शेतकऱ्यांना MSP देणं बंधनकारक असेल हे नवीन कायद्यात लिहून द्या
  • २) शेतकऱ्यांना MSP नाही मिळाली तर सरकारने जबाबदारी घ्यावी.  
  • ३) MSP न देणाऱ्या कंपनीला सजेची तरतूद कायद्यात असावी
  • संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here