कॉंग्रेसने समोर आणला फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ; पहा काय म्हणालेत फडणवीस

मुंबई :

सध्या देशभरात कृषी विधेयक, मराठा आरक्षण हे दोन चर्चेतील मुद्दे आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजप आणि महाविकास आघाडीने आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या. दरम्यान ‘राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडू शकले नाही’, असा आरोप भाजपने केला होता. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ समोर आणला आहे.

या व्हिडीओत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, सरकार याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही. उच्च न्यायालयच याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत. तरीदेखील काही पक्ष आणि काही संघटना हे माहिती असूनदेखील समाजात तेढ निर्माण व्हावी, राजकीय हेतून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपा नेते सोयिस्करपणे गजनी होतात आणि यांची स्वतःचीच वक्तव्ये त्यांना ऐकवणे आवश्यक ठरते. #मराठा आरक्षण, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here