सपना चौधरीने मोदी सरकार आणि मिडीयाला सुनावले; पहा काय म्हटलेय तिने

कृषी सुधारणा विधेयक मंजूर झाल्यावर देशभरातील शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करणे अपेक्षित होते. मात्र, त्यातील भविष्यात जाचक असलेल्या नियमांमुळे सध्या त्यालाच शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. मोठ्या माध्यम संस्थांनी हा विरोध दाखवण्याचे टाळले आहे. त्यावर सुप्रसिद्ध डान्सर अभिनेत्री सपना चौधरी संताप व्यक्त केला आहे.

इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडियो पोस्ट करून सपनाने म्हंटले आहे की, सुशांत राजपूत याच्या केसमध्ये जसे लोकांनी एकत्र येऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पुढे ती मागणी सरकारला मन्या करावी लागली. आताही सर्वांनी एकत्र येत देशातील इतर महत्वाच्या मुद्यावर असेच बोलायला पाहिजे. आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी विधयकावर विरोध दर्शवायला हवा. आपण सगळ्यांनी देशातील शेतकऱ्याला पाठिंबा द्यायला हवा.

देशात कृषी आंदोलन केल्यावर अनेक शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना मारहाणसुद्धा झाली होती. याच्या बातम्याही माध्यमांनी दाखावल्या नाहीत. शेतकरी म्हणतात आमच्या मागण्या मान्य करा. त्यांचा तो हक्क आहे. त्यांच्या मागण्या केंद्र सरकार नाही पूर्ण करणार तर कोण करणार. केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे असेही सपनाने म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here