शरद पवारांची ‘ती’ गोष्ट आम्हाला १०० हत्तींचे बळ देणारी; ‘त्या’ कॉंग्रेस खासदाराने मानले आभार

मुंबई :

सध्या देशाच्या राजकारणात कृषी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निलंबित खासदारांना पाठींबा द्यायचा म्हणून एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे सांगितले. याच पार्श्वभूमीवर ‘आमच्यासाठी ही शंभर हत्तींचे बळ मिळणारी गोष्ट आहे’, असे म्हणत कॉंग्रेसचे निलंबित झालेले खासदार राजीव सातव यांनी पवारांचे आभार मानले.

सातव यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आदरणीय शरद पवार साहेबांनी आमच्या निलंबनाबद्दल आज जाहीर नापसंती व्यक्त केली. इतकंच नाही तर आमच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देत स्वतःही एक दिवसाचे उपोषण ते करत आहेत. आमच्यासाठी ही शंभर हत्तींचे बळ मिळणारी गोष्ट आहे.

सातव यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतीक्रिया आलेल्या आहेत. दीपक मोरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र मराठी माणूस सदैव आपल्या सोबत आहे. महाराष्ट्रतील आघाडीचे आक्रमक खासदार म्हणुन तुमची ओळख आहे. जनतेचा हिताचे प्रश्न तुम्ही आक्रमकपणे मांडता. साहेब नका काळजी करू. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here