तर पवारांना होणार मोठा दंड; वाचा नेमके काय आहे ‘ते’ प्रकरण

२००९, २०१४ आणि २०१९ या वर्षांमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना नोटीस आलेली आहे. जर नोटीसचे वेळेत उत्तर दिले नाही तर प्रतिदिन १० हजार रुपये इतका मोठा दंड त्यांना द्यावा लागणार आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, सुप्रियालाही काल संध्याकाळी नोटीस येणार होती. मात्र, पहिली नोटीस मलाच आली, हे चांगले झाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाने ही नोटीस पाठवल्याचे मला समजले. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे.

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

या नोटिसला लवकरात लवकर उत्तर देऊ, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. कारण वेळेत उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असा उल्लेखही संबंधित नोटीसमध्ये असल्याचे पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये म्हटले आहे.

आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here