सहा नाही तर १० हजारांचा सन्मान निधी; ‘त्या’ शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर

पीएम किसान सन्मान निधी योजनेतून भारतीय शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये मदत दिली जाते. मात्र, त्यामध्ये आता ४ हजारांनी वाढ करून शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीने १० हजार रुपये सन्मान निधी देण्याची तयारी मध्यप्रदेश सरकारने केली आहे.

मुख्यमंत्री किसान सम्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला दोन हप्त्यामध्ये ४ हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळण्यासाठी चौहान यांनी शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे. विधानसभेच्या २७ जागा रिक्त असून आताचे सरकार वाचवण्यासाठी भाजपला यातील किमान ९ आमदार निवडून आणावेच लागतील. पोटनिवडणुका कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका नाहीत किंवा केवळ पोटनिवडणूक नाहीत तर ‘राज्याचे भविष्य ठरविण्याची निवडणूक’ आहे, असे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकतेच म्हटले आहे.

पोटनिवडणुकीत विजय मिळावा, यासाठी शिवराज सरकार तयारीत आहे. सरकारच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना आता सन्मान निधी म्हणून १० हजार रुपये मिळणार आहेत. यापूर्वीही शिवराज चौहान यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र, अनेक शेतकर्‍यांनी एक रुपया, पाच रुपये माफ केले होते, त्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता यातून कोणीही सुटणार नाही आणि शेतकरी नाराज होणार नाहीत याचीही काळजी भाजप घेत आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here