मोदींचा ‘तो’ फोटो ट्रेंडमध्ये; अनेकांना वाटतेय कौतुक..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो प्रेम जगजाहीर आहे. त्यांनी काढलेल्या फोटो आणि व्हिडिओ यांना मोठा ट्रेंड मिळतो. आताही कृषी सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने मोदींचा शेतात काम करण्याचा एक फोटो ट्रेंडमध्ये आहे.

या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांनी शेतात काम करण्याचे फावडे हातात घेतले आहे. ते त्यात काम करताना दिसत आहेत. मोदी यांच्या वेगवेगळ्या स्टाईलने फोटो काढण्याच्या आवडीमुळे अनेकांना याचे कौतक वाटत आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्ती कसा शेती-मातीशी नाळ कायम ठेऊन आहे हेच भाजप कार्यकर्ते यातून सांगत आहेत. तर, अनेकांना हा फ़क़्त फोटोसेशन करण्याचा प्रकार वाटत आहे.

यामध्ये मोदीजी यांनी कुर्ता, पांढरा पायजमा घटलेला आहे. ते पाणी दिलेल्या शेतात काम करताना दिसत आहेत. त्यावरून काहींनी अनावश्यक टीकाही सुरू केली आहे. शेतात पांढरे कपडे घालून आल्यावर काम करताना खराब कसे झालेले नाहीत असा प्रश्न काहींना पडला आहे. काहींनी आपल्या वाईट पद्धतीने मोदिजींच्या कामावरही प्रश्न उपस्थित केलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here