मोदी सरकारविरोधात शरद पवार झाले आक्रमक; उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई :

सध्या देशाच्या राजकारणात कृषी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी विधेयकाला विरोध केल्यामुळं काल ८ खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्या सर्व खासदारांनी अन्नत्याग केला आहे. हे कळताच निलंबित खासदारांना पाठींबा द्यायचा म्हणून शरद पवारही एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

पवार यांनी स्पष्ट केले की, सरकारला लवकरात लवकर हे विधेयक मंजूर करून घ्यायचं होतं. मात्र, सभागृहातील अनेक सदस्यांना विधेयकाबाबत प्रश्न होते. मात्र, सरकारला चर्चा नको होती. सरकारला विधेयक रेटून न्यायचं होतं, असं प्रथमदर्शनी दिसतं.

निलंबन प्रकरणाचा घोळ सांगताना पवार म्हणाले की, सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन सदस्य नियमांचं पुस्तक दाखवत होते. मात्र, त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळं संतापून जाऊन सदस्यांनी ते पुस्तक फाडलं. उपसभापतींनी विरोधी सदस्याचं म्हणणं किमान ऐकून घेणं अपेक्षित होतं. मात्र, तसं न करता मतदान घेण्यात आलं.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here