म्हणून ते कर्मवीर झाले; रयते’ला ज्ञानमार्ग दाखवणाऱ्या भाऊराव पाटील यांची आहे आहे जयंती

आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती. भाऊराव पाटील यांचं नाव घेतले की ‘रयत’ हे नाव आठवते. सर्वसामान्य रयतेचा, तळागाळातील जनतेच्या शिक्षणाचा विचार कृतीतुन ज्यांनी रुजवला असे भाऊराव. कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर आम्हाला आयुष्यभर म्हसरं राखावी लागली असती, असं बोलणारी पिढी आता वयस्कर व्हायला लागली आहे. ग्रामीण भागात, शहरी भागात आणि अवघ्या महाराष्ट्रात ‘रयत’ने जे ज्ञानदानाचे काम केले आहे त्याला तोड नाही.

महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र का म्हटले जाते, असा ज्या-ज्या वेळी प्रश्न पडतो त्या-त्या वेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या जडणघडणीत होती त्यामुळेच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणले जाते हे आठवते. त्यांचा जो उदत्ता हेतु होता तो सर्व मानवजातीच्या कल्याण होईल असा होता. महाराष्ट्र हे नशीबवान राज्य आहे की जिथे कर्ते समाजसुधारक झाले. ज्यांच्या नजरेच्यासमोर भविष्याती महाराष्ट्र कसा असला पाहिजे याचा सर्वांगीण दृष्टीकोण होता.

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयतची स्थापना केली. त्यांच्या बद्दल एक किस्सा अभिमानाने सांगितला जातो तो म्हणजे एका वर्गणी देणाऱ्या व्यक्तीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदला मी वर्गणी देतो असे संगितले. त्यावेळी त्यांनी संगितले होते की वेळ आली तर मी “छत्रपती शिवरायांचे नाव बदलणार नाही”. अशा करारी आणि आपल्या महापुरुषांच्या बाबतीत आदर असणारे भाऊराव पाटील होते.

त्यांचं महात्मा गांधी यांच्यावर असणारे प्रेम सर्वश्रूत होते. ‘रयत’च्या १०० पेक्षा जास्त शाळांना महात्मा गांधी यांचे नाव दिलेल आहे. ‘कमवा आणि शिकवा’. “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” असे ब्रीदवाक्य घेऊन यशस्वी वाटचाल आजही रयतची सुरू आहे.

महाराष्ट्रातील ७०० पेक्षा जास्त वसतिगृह आज रयत शिक्षण संस्थेची आहेत. २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधी यांच्या हस्ते ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस’चे उद्घाटन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी त्यावेळी या संस्थेला ५०० रुपयांची वार्षिक मदत सुरू केली होती.

लेखक : गणेश शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here