पवार साहेबांचा कोणी गेम केला असेल तर तो अजित दादांनी केला; ‘या’ भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

मुंबई :

‘पहाटे केलेल्या शपथ विधीनंतर आमदार टिकले नाही म्हणून अजित दादा पवार परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला’, असे म्हणत माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी नव्या वाद उभा केला आहे.

महाविकास आघाडीच्या विविध मुद्द्यांवर राणे नेहमीच टीका करत असतात. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी NCP शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला.

राणे यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कुमार चव्हाण यांनी म्हटले आहे की, पार्थ पवार ला निवडणुकीत पवार साहेबांनी मदत केली नाही मात्र, रोहित पवारला भरघोस मतांनी निवडुन आणलं. यात सगळं काही राजकीय घडी समजली गेली. पवार साहेब जे निर्णय घेतात ते अजित दादांना पटत नाही. कारण अजितदादा ना पवार साहेबांच्या खुर्चीवर तर बसायचं नाही ना? हा कधी कधी मोठा प्रश्न पडतो.

विवेक सोनवणे यांनी म्हटले आहे की, अहो त्या पवार फॅमिली ने मिळून अख्ख्या भाजपचा गेम केला. त्याच काय?

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here