धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर काळाच्या पडद्याआड

मुंबई :

जेष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर याचं वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं. ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या शुटींगच्या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. या मालिकेच्या शुटींगदरम्यान मुंबईहून आलेल्या एका डान्सच्या टीममधील लोकांना कोरोना झाला होता. त्यांच्यामार्फत आशालता बावगावकर यांच्यासह मालिकेतील २७ जणांना कोरोना झाल्याचे समजत आहे.

त्यांना त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती खालावतच चालली होती. नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु शरीराने औषधोपचारांना साथ न दिल्यामुळे रुग्णालयातच आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. आपल्या अभिनयासह प्रेमळ स्वभावामुळे त्या प्रसिद्ध होत्या. अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. आजवर त्यांनी विविध भाषांमधील १००पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here