शिवसेनेची जळजळीत टीका; नटीच्या प्रेमाखातर कोणी फुले उधळत असतील तर…

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात किसान बिलविषयी तसेच प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले त्याविषयी भाष्य केले आहे.

वाचा नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

तिकडे उत्तर प्रदेशात एका किरकोळ प्रकरणात ‘आप’चे खासदार संजय सिंग यांच्यावर योगी सरकारच्या पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. संजय सिंग यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या काळातील अन्याय व वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रश्न विचारले. कोरोनासंदर्भात झालेल्या अफरातफरीवर बोट ठेवले. त्यामुळे खासदारावर सरळ देशद्रोहाचा गुन्हाच दाखल व्हावा हे धक्कादायक आहे. न्यायासाठी आवाज उठविणारा शेतकरी आतंकवादी. भ्रष्टाचाराविरुद्ध प्रश्न विचारणारे खासदार देशद्रोही! राज्यांचे हक्क व अस्मितेसाठी लढणारे सगळेच देशाचे दुश्मन.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवणाऱ्या कानडी सरकारच्या विरोधात आवाज उठविणारे मऱ्हाटी सीमाबांधवही खतरनाक देशद्रोही! मग आमच्या लोकशाहीप्रधान देशात राष्ट्रवादाची, राष्ट्रभक्तीची नवी व्याख्या बनवून कोणी हिंदुस्थानच्या घटना पुस्तकात चिकटवली असेल तर तसे लाल किल्ल्यावरून एकदाच जाहीर करावे. किसानांचा अवमान हा सीमेवरील जवानांचाही अवमान आहे. स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या लाखो कष्टकऱ्यांचा अवमान आहे. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारविरोधी उभ्या ठाकलेल्या बार्डेली सत्याग्रहातील शेतकऱ्यांचा अवमान आहे. त्या अवमानावर नटीच्या प्रेमाखातर कोणी फुले उधळत असतील तर इतिहास त्यांना माफ करणार नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here