ब्रेकिंग : राजीव सातवांसह ८ कॉंग्रेसी खासदारांचे निलंबन; कृषी विधेयकाचा विरोध नडला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी अशा कृषी विधेयकाला केलेला विरोध काँग्रेसच्या आठ खासदारांना नडला आहे. याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या राजीव सताव यांच्यासह इतर सात खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे.

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आठही खासदारांचे आगामी 7 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. वादग्रस्त शेती विधेयकावरून काल जोरदार गदारोळ झाला. कृषीमंत्री नरेंद्र तोमर हे बोलायला उभे राहिले असता विरोधकांनी एकच गोंधळ घातला होता.

कृषीमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी उत्तर देण्याची विरोधी पक्ष नेते गुलाम नवी आझाद यांनी मागणी केली होती. पण, या गोंधळात कृषीमंत्री चर्चेला उत्तर देत होते. त्यावेळी झालेल्या गोंधळ उपसभापतींसमोर माईक तोडण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक आणि शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन आणि कृषि सेवा विधेयक सादर केले. या दोन्ही विधेयकांवर आवाजी मतदान घेऊन मंजुरी देण्यात आली.

संपादन : गणेश शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here