ब्रेकिंग : बँकांच्या मदतीने कोट्यावधींचा घोटाळा; १.५३ अब्ज डॉलरची देवाणघेवाण..!

ऑगस्टा वेस्टलँड, एअरसेल मॅक्सिस, २जी घोटाळा आणि रोल्स रॉयस लाचखोरी प्रकरणासह करचोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेल्या कंपन्या आणि व्यक्तींच्या नावांचा समावेश असलेला महाघोटाळा उघडकीस येण्याच्या मार्गावर आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

दोन हजार गोपनीय कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पैशांची मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या देवाणघेवाण करणाऱ्या अनेक भारतीयांच्या नावांचा उलगडा झाला आहे. दरम्यान, या अफरातफरीमध्ये ज्यांच्या मदतीने हे घोटाळे झाले, त्या बँकांच्या नावांचाही समावेश आहे. या यादीत अशा कंपन्या आणि व्यक्तींचा समावेश आहे ज्यांची चौकशी भारतातील सीबीआय, ईडी आणि डीआरआय अशा यंत्रणा करत आहेत. पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे.

मेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files) कडे भारतातील घोटाळेबाज, भ्रष्ट नोकरशाहा आणि बँकांमध्ये अफरातफर करणाऱ्यांची एक अशी यादी आहे. ही नावे जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता आहे. कागदपत्रांमधून भारतातील सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा उलगडा झाला आहे.

फाइल्समध्ये ग्लोबल डायमंड कंपनीचा एक सदस्य, हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील कंपन्या, आयपीएल टीमची स्पॉन्सर कंपनी. तुरुंगातून दुर्मीळ वस्तूंची तस्करी करणारा, आलिशान कार विकणारा एक डिलर, अंडरवर्ल्ड डॉनचा फायनान्सर यांच्यासह कंपन्या आणि व्यक्तींच्या यामध्ये नावांचा समावेश आहे. भारतातील ४४ बँकांचा वापर अवैधरीत्या देवाणघेवाण करण्यासाठी झाला असल्याचे बातमीत म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहना चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here