आरक्षणाचा मुद्दा पेटला; सोलापुरात बंदची हाक, ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्रात पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारने अराक्षण देण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी आता सोलापूर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आलेली आहे. तर, अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरून आपला विरोध असल्याचे दाखवून देऊन लागले आहेत.

मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर समाज संतप्त झाला आहे. आज सोलापूरच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केला आहे. आज सकाळी पंढरपूर-पुणे मार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. निमगाव पाटी इथे टायर जाळून वाहतूक बंद केली आहे. आरक्षण प्रश्नी पंढरपूर माढा माळशिरस येथील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, असे न्यूज १८ लोकमत यांच्या बातमीत म्हटलेले आहे.

सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचे आंदोलन चालू आहे. स्थगिती मिळाल्यानंतर बारा दिवस झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांना आंदोलन न करण्याबाबत पोलीसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील आंदोलन करण्यावर कार्यकर्ते ठाम आहेत. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार असल्याचे त्यांनी कळवले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here