कृषी विधेयकाच्या मुद्दावर शेतकरी रस्त्यांवर; मोदी सरकारच्या डोकेदुखीत होतेय वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती विधेयक (Farm Bills 2020) मंजूर करवून घेतले आहे. मात्र, त्याच्या विरोधात फ़क़्त विरोधी पक्ष नाहीत, तर शेतकरीही आक्रमक झालेले आहे. पंजाब व हरियाना येथील हजारो शेतकऱ्यांनी हे विधेयक मागे न घेउस्तोवर घरी न जाण्याची घोषणा केली आहे. तर, अनेक ठिकाणी आंदोलकांना पंगवायला पोलिसांना पाण्याचे फवारे फवारे मारावे लागले आहेत.

शेतकरी विधेयकावरून हरियाणामध्ये 16-17 शेतकरी संघटनांनी तीव्र आंदोलन पुकारल्याने अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अंबालाचे एसपी अभिषेक जोरवाल यांनी म्हटले आहे की, भारतीय किसान यूनियनने जोरदार विरोधात आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग तोडून कार्यकर्ते पुढे आले होते. त्यामुळे त्यांच्यावर पाण्याचा मारा करावा लागला.

काल राज्यसभेत मोठ्या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक आणि शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन आणि कृषि सेवा विधेयक सादर केले. या दोन्ही विधेयकांवर आवाजी मतदान घेऊन मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नेमके कोणी कोणाला किती मतदान केले समजू शकलेले नाही. काही विरोधी पक्षांनी मतदानाच्या दरम्यान सभागृहाच्या बाहेर जाणे पसंत केले होते. एकूणच यावेळी विरोधकांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

त्याचवेळी ऐन करोनाच्या संकटात ही आंदोलने पेटल्याने शेतकऱ्यांना शांत करण्याचे मोठे आव्हान आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारसमोर निर्माण झालेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here