म्हणून ‘त्या’ शेतकऱ्याने संपवले जीवन; वाचा धक्कादायक बातमी

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक 2020 ही दोन विधेयके फ़क़्त आवजी बहुमताने गोंधळात मंजूर करण्याची किमाया काळ राज्यसभेत झाली. याच मुद्यावर पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, देशाने त्याची अजिबात दखल न घेतल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवून टाकली.

दैनिक प्रभात यांनी आपल्या बातमीत म्हटले आहे की, केंद्र सरकारने आणलेल्या शेतीशी संबंधित विधेयकांविरोधात पंजाब आणि हरियाणात निदर्शनांचे सत्र सुरू आहे. अशातच पंजाबमधील निदर्शनात सहभागी झालेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचे विष प्यायल्याने निधन झाले. ती घटना मुक्‍तसर जिल्ह्यात घडली. प्रितम सिंग (वय 70) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

एकूणच यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर केलेल्या या कायद्याला शेतकऱ्यांचा अजूनही कडाडून वोरोध कायम आहे. शेतकऱ्यांना हमी भाव नाकारणारी, बाजार समित्या उद्‌ध्वस्त करण्यास कारण ठरणारी, सरकारची जबाबदाऱ्यांमधून मुक्‍तता करणारी व शेती आणि शेतकऱ्यांना बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्या, व्यापारी, दलाल, निर्यातदारांच्या दावणीला बांधणारी ही तीन विधेयके मंजूर करण्याची प्रक्रिया मोदी सरकारनेपुढे रेटली आहे. सरकारची ही कृती शेतकरी विरोधी असल्याचे अखिल भारतीय किसान सभेने म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here