प्रसिद्ध निवेदक उद्धव kp यांच्या ‘चहा, बिस्कीट आणि kp’ या सिरीजला मिळतोय प्रचंड प्रतिसाद

अहमदनगर :

पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध निवेदक म्हणून नावाजलेले उद्धव काळापहाड यांच्या kp live या युट्युब channel वरील ‘चहा,बिस्कीट आणि kp’ ही मुलाखत मालिका जबरदस्त प्रसिद्ध होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गाजत असलेल्या ‘गावरान मेवा’ या वेबसीरीजमधील कलाकारांच्या मुलाखती घेत त्यांनी या मुलाखत मालिकेला सुरुवात केली.

kp live या युट्युब channel वरील जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रहारचे बच्चू कडू, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच ‘एक दिवस जितेंद्र आव्हाडांसोबत’ अशा व्हिडीओला मोठा  प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या काळात राजकीय गोष्टी समोर आणल्या. नंतर मनोरंजन क्षेत्रात नावाजलेल्या पण ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असणाऱ्या कलाकारांना kp लाईव्हच्या माध्यमातून पुढे आणण्याचे उद्धव यांनी ठरवले. पुढे गावरान मेवा या गाजलेल्या वेबसिरीजमधील संज्या(लहुकुमार चोभे), गणप्या(महेश काळे) आणि सुगंधा(स्वाती ) या कलाकारांच्या घेतलेल्या मुलाखतींनी उच्चांक गाठला. लाखोंनी विव्ज मिळाले.

kp लाईव्हच्या माध्यमातून घडले सामाजिक कार्य आणि जपली बांधिलकी :-

श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे गावच्या tiktok स्टार पूनम तुपे यांची लॉकडाऊनच्या काळात उद्धव काळापहाड यांनी मुलाखत घेतली. याच मुलाखतीदरम्यान उद्धव यांनी पूनमताईला मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर अनेक लोकांनी त्यांची भेट घेत त्यांना मदत केली.

सध्या ‘चहा,बिस्कीट आणि kp’ या मुलाखत मालिकेत अजूनही काही प्रसिद्ध आणि ग्रामीण कलाकार दिसणार आहेत. तोपर्यंत तुम्हीही जाऊन पहा आणि एन्जॉय करा.

संपादन : स्वप्नील पवार

kplive या युट्युब channel ची लिंक :-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here