मोदींच्या अडचणीत आणखी वाढ; TRS करणार कृषी बिलास जोरदार विरोध

क्रांतिकारी निर्णय म्हणून भाजप भलामण करीत असलेल्या कृषी सुधारणा विधेयकाला Agriculture Reform Bills देशभरातून जोरदार विरोध होण्यास सुरुवात झालेली आहे. अकाली दलाने भाजपची याच मुद्यावर साथ सोडल्यानंतर आता इतरही अनेक राजकीय पक्षांनी हे विधेयक कसे शेतकरीविरोधी आहे याचे दाखले देण्यास सुरुवात केली आहे.

तेलंगाना राष्ट्र समितीचे (TRS) प्रमुख आणि तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणजे शेतकरी हिताचे निर्णय घेणारा खमक्या आणि दूरदृष्टी असलेला नेता अशीच देशभरात ओळख आहे. त्यांनी हे विधेयक म्हणजे गोड असलेल्या विषारी गोळ्या असल्याचे म्हटले आहे. हे ऐकायला आणि पाहायला खूपच छान वाटते. मात्र, प्रत्यक्षात हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे राज्यसभेत त्यांचा पक्ष या विधेयकाला विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगून टाकले आहे.

तेलंगाना राष्ट्र समितीचे राज्यसभेत सात सदस्य आहेत. त्या सर्व खासदारांना या विधेयकाचा विरोध करण्याच्या सूचना पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत झाला आहे. त्यानुसार पार्टीचे संसदीय मंडळाचे प्रमुख के शेखर राव यांच्या नेतृत्वाखाली या विधेयकावर भाजपला खिंडीत पकडण्याची तयारी या पक्षाने केली आहे. एकूणच नरेंद्र मोदी यांच्या लोकशाही आघाडी सरकारला या कायद्यामुळे देशभरातून मोठा विरोध सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

कृषी सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी आता देशभरातील प्रमुख संघटना आणि शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डीनेशन कमिटी All India Kisan Sangharsh Coordination Committee (AIKSCC) यांनी दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी बंदची हाक दिली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here