तर ठाकरे पिता-पुत्र आणि सुप्रिया सुळे तुरुंगात जातील; पहा काय म्हटलेय TOI च्या न्यूजमध्ये

निवडणुकीतील अर्ज भरताना संपत्ती आणि इतर विवरण यांची खरी माहिती द्यावी लागते. मात्र, त्यामध्ये काहीही लपवाछपवी केल्यास किमान ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो. असेच प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र व मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दाखल झालेले आहे.

टाईम्स ऑफ इंडिया यांच्या बातमीत म्हटले आहे की, शिवसेनेचे ठाकरे पिता-पुत्र आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अशा पद्धतीच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यांची चौकशी करून मगच कारवाईचा निर्णय ठरणार आहे. संपत्तीचे विवरण देताना काही गोष्टी लपवल्या असल्याचे त्या तक्रारीत म्हटलेले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही अशाच पद्धतीने गुन्ह्यांची माहिती लपवली असल्याचे एक प्रकरण प्रलंबित आहे. आता या तीन मोठ्या नेत्यांच्या विरोधात अशीच तक्रार दाखल झालेली आहे. एकूणच निवडणूक अर्ज भरताना अनेकदा गोंधळ केल्याच्या तक्रारी येतात उधे त्याच्या चौकशीत जास्त वेळ दवडला जातो. आताही या तीन नेत्यांच्या विरोधातील तक्रारीत कितपत तथ्य आहे हे समजण्यास किती वेळ लागणार हे काळच ठरवेल.

संपादन : सचिन पाटील

मूळ बातमी : https://navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/discrepancies-in-poll-affidavits-complains-against-uddhav-thackeray-aditya-thackeray-supriya-sule-send-to-cbdt/articleshow/78212947.cms

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here