‘त्या’ IPS अधिकाऱ्यांनी केला आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न; पहा काय म्हटलेय गृहमंत्र्यांनी

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रातील भाजप आणि राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे शिलेदार उतावीळ झाल्याचे आरोप वेळोवेळी झालेले आहेत. आताही महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल गौप्यस्फोट केला आहे. दैनिक लोकमत ऑनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर माहिती दिली आहे.

त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहे. ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले.

एवढंच नाहीतर, शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले. त्याच बरोबर चार अधिकाऱ्यांची नावही सांगितली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावलं उचलत काही अधिकाऱ्यांना बाजूला सारले. तर काही अधिकारी अजूनही पदावर कायम आहे, असेही त्यांनी त्या मुलाखतीत म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here