‘त्या’ मुद्द्यावरून गृहमंत्र्यांनी केले घुमजाव; पहा काय म्हटलेय नव्याने ते

चार-पाच आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता त्यांनी त्या मुद्द्यापासून घुमजाव केले आहे.

देशमुखांनी म्हटले होते की, चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहे. ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले.

दैनिक लोकमत ऑनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी याची माहिती दिली होती. मात्र, आता त्यांनी त्यांच्या मुद्याचा विपर्यास झाल्याचे म्हटले आहे. आता नव्याने यावर बोलताना त्यांनी म्हटले आहे की, चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे. व्हिडीओ क्लिपिंग पाहा. मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही, इतकंच बोललो होतो.

चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे. मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही, एवढंच माझं वाक्य आहे. शेवटी मी कुटुंबप्रमुख आहे. आम्ही पोलीसवाले संपूर्ण कुटुंब म्हणून काम करतो, असेही पुढे त्यांनी सांगितले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here