वाचा ‘कान्सा’यनाच्या इंडियन टचची माहिती; कारण आज आहे कान्स महोत्सव दिन

कान्स चित्रपट महोत्सवाची स्थापना ही आजच्या दिवशी म्हणजेच २० सप्टेंबर १९४६ साली झाली. या चित्रपट महोत्सवाचे आयोजन हे फ्रान्समधील कान्स या शहरात केले जाते. १९४८, १९४९ साली बजेट नाही म्हणून या चित्रपट महोत्सवाचे आयोजन झाले नव्हते. तसेच कान्स फिल्म फेस्टिव्हल हा मे महिन्यात आयोजित करण्यात येतो.  या महोत्सवात जगभरातील निवडक डॉक्युमेंट्री, चित्रपट दाखवण्यात येतात. सुरुवातीच्या वर्षी तब्बल २१ देशातील चित्रपट, डॉक्युमेंट्री दाखवण्यात आल्या होत्या.

कान्स चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच चेतन आनंद यांचा १९४६ साली “नीचा नगर” नावाचा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटाला ‘ग्रँड प्रिक्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार २०१३ साली इरफान खान यांच्या “लंच बॉक्स” या फिल्म ला सुध्दा मिळाला होता. कान्स चित्रपट महोत्सवात एखाद्या चित्रपटाची स्क्रिनिंग होणे ही खूप अभिमानास्पद बाब असते. या ठिकाणी भलेही पुरस्कार मिळाला नसेल पण स्क्रिनिंग झाली म्हणजे देशभरात चर्चा होते. अशी संधी भारतातील कित्येक चित्रपटांना मिळाली आहे. 

कान्स चित्रपट महोत्सवात बॉलिवूडमधील अभिनेत्री रेड कार्पेटवर चालायला मिळावं म्हणून धडपडत असतात. तसेच चालण्यासाठी अभिनेत्री प्रसिद्ध सुद्धा होतात. तसेच २००२ साली देवदास या चित्रपटाची या ठिकाणी निवड झाली व २००३ साली ऐश्वर्या राय ही कान्स चित्रपट महोत्सवात पहिली महिला ज्युरी झाली. 

संपादन : गणेश शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here