‘भावी पंतप्रधान’ स्वत: कृषीमंत्री असताना फक्त ‘ती’ पार्टी करत होते का; भाजपची जहरी टीका

मुंबई :

कितीही कोकलत बसा. तुम्हाला फाट्यावर मारुन भाजपाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायदा आणला आहे. कृषीमंत्री असताना काय फक्त हुरडा पार्टी करत होता का?, असे म्हणत भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नाव न घेता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांना टोला लगावला आहे.

वाघ यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, भाजपाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायदा आणला आहे. आता “दलालांसोबत रुदाली” हा एकमेव कार्यक्रम राहीला आहे. शेतकरीद्रोह्यांच्या हातात. जलते रहो

पुढे वाघ यांनी आठवण करून दिली की, राज्यसभेत किसान बिल  मंजूर होत असताना माजी कृषिमंत्री व भावी प्रधानमंत्री गैरहजर होते.

वाघ यांच्या या ट्वीटवर लोकांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. किसान बिल मंजूर होत असतानाच मोदी सरकार मधील सहकारी केंद्रीय मंत्री या बीलाचं कारण देत राजीनामा देत आहेत, अशा आशयाच्या प्रतिक्रिया आहेत.

संदीप गुंजाळ यांनी म्हटले आहे की, शिवसेनेनं पण मतदानावेळी केला वाॅक आऊट. . भाषणात विरोध केला असला तरी शिवसेनेनं सभा त्याग केला. लोकसभेत कृषी विधेयकाला पाठींबा आणि राज्यसभेत सभात्याग करून अप्रत्यक्ष पाठींबा..!

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here