ब्रेकिंग : दोन विधेयक मंजूर; राज्यसभेत गोंधळ, एक मात्र लटकले

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाली होती. यातील कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक 2020 ही विधेयक राज्यसभेत देखील मंजूर झाली.

या विधेयकांना विरोध करण्यासाठी विरोधी खासदार उपसभापतींच्या आसनापर्यंत पोहोचले. या गोंधळात केंद्रीय कृषी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे या संदर्भातील प्रश्नांची उत्तर देत होते. दरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. सभागृहात मोठा गोंधळ उडाल्यानंतर उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here