ही सरळ सरळ बाळासाहेब ठाकरेंची बदनामी; ‘त्या’ माजी खासदाराने शिवसेनेला डिवचले

मुंबई :

मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित, उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मते बदलली, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप याने दिली. याच पार्श्वभूमीवर ‘उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे’, असे मत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले की, ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे. हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं.

राणे यांच्या या ट्वीटवर लोकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. या ट्वीटवर बहुतांश लोकांनी शिवसेनेविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. संतोष कांगणे यांनी म्हटले आहे की, नेहमीच गांधींचा विरोध करणारे ठाकरे कुटुंबाला सध्या फक्त नोटेवरच्या गांधींचीच भाषा कळते.

अमर वारीशे यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांना जो पैसे देणार तो त्यांच्यासाठी चांगला. बाकी गेले उडत कारण आम्हाला मातोश्री 3 बांधायची आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here