कृषी विधेयक म्हणजे शेतकऱ्यांचं डेथ सर्टिफिकेट; पहा मोदींवर टीका करताना काय मुद्दे मांडलेत विरोधकांनी

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर केल्यानंतर आता यावरून राज्यसभेत घमासान रंगले आहे. यावरून कॉंग्रेस, शिवसेना आणि सर्वच विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या श्रीमंतांना मोठे करण्याच्या धोरणावर कडाडून विरोध केला आहे.

बिलावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरु असून विरोधकांकडून बिलावरुन सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे बिल म्हणजे शेतकऱ्यांचे डेथ सर्टिफिकेट असल्याचं काँग्रेसनं म्हटले आहे. तर, ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का, त्यानंतर यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची ग्वाही सरकार देणार का, असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला, ते म्हणाले की, देशातील 70 टक्के लोक शेतीशी जोडले गेलेले आहेत. संपूर्ण लॉकडाउनच्या काळात शेतकरी काम करत होता. ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असे मोदी सरकार म्हणणार आहे का?

या विधेयकांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. विधेयकासंदर्भात काही गैरसमजही आहेत. सरकारने हे गैरसमज दूर करायला हवेत. पंतप्रधान मोदी म्हणतात की, विधेयकाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे मला विचारायचं की, अफवेमुळेच एका मंत्र्यानं राजीनामा दिला का, असा मुद्याचा सवाल राऊत यांनी केला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here