संजय राऊत यांनी मोदी सरकारला दिले ‘हे’ आव्हान; पहा शेतकऱ्यांच्या मुद्यावर काय म्हटलेय त्यांनी

सध्या लोकसभेत कृषी सुधारणा विधेयकावरून घमासान रंगले आहे. अशावेळी लोकसभेत या विधेयकाबद्दल विशेष काहीही न बोलणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला जोरदार आव्हान दिले आहे.

राज्यसभेत बोलताना पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ही विधेयके कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणत असतील तर मग देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने का केली जात आहेत याचेही उत्तर द्या की. कृषी विधेयकाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यांच्यावर काठ्या चालवल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक सेवा अशी तीन विधेयके सादर करण्यात आली. यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची हमी देणार का, असाही प्रश्न राऊत यांनी केला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here