नरेंद्र मोदी-किसान विरोधी; राहुल गांधींनी केली ‘त्या’ महत्वाच्या मुद्द्यांसह जोरदार टीका

मोदी सरकारचा कृषीविरोधी ‘काळा कायदा’ देशातील शेतकऱ्यांसाठी घातक आहे. कृषी उत्पन्न बाजार पेठा बंद झाल्यानंतर हमीभाव (MSP) कसे मिळणार आणि MSP ची हमी मोदी सरकार का देत नाही, असे प्रश्न उपस्थित करतानाच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

त्यांनी नरेंद्र मोदी-किसान विरोधी असे म्हणताना लिहिले आहे की, देशातील शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. मात्र, भारतीय जनता मोदी सरकारचा हा डाव कधी यशस्वी होऊ देणार नाही. ‘शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरून विश्वास उडाला आहे. मोदी यांच्या बोलण्यात आणि कृती करण्यात फरक आहे. नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि डिझेलवरती प्रचंड कर हे यावरून सिद्ध झालं आहे. कृषी विधेयकामुळे मोदी सरकार आपल्या मित्रांचा व्यापार वाढवणार आणि शेतकऱ्यांच्या रोजी रोटीवर हल्ला करणार आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

एकूणच मोदी सरकारने भारतीय शेतकऱ्यांना श्रीमंतांचे गुलाम करण्याचा हा नवा डाव आखल्याचा आरोप गांधींनी केला आहे. ‘स्वराज्य आणि राष्ट्रवादाचा थेट संबंध अहिंसेशी आहे. भारतीय राष्ट्रवाद कधीही क्रौर्य, हिंसा आणि धार्मिक वादाला साथ देऊ शकत नाही,’ असेही गांधीनी म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here