‘त्यांनी’ कोणते च्यवनप्राश खाल्ले, हे गृहमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं; ‘या’ भाजप नेत्याची टीका

अहमदनगर :

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका मुलाखतीत बोलताना धक्कादायक खुलासा करत सांगितले की, महाविकास सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सवाल करत म्हटले की, सुशांत आणि दिशा सालीयन प्रकरणात दोन महिने ज्यांना इंचभर पुढे सरकता आले नाही ते पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले? त्यांनी असे कोणते च्यवनप्राश खाल्ले हे गृहमंत्री यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं तर बरे झाले असते.

भातखळकर यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. गिरीश पाटील यांनी म्हटले आहे की, हे चालले आहे तरी काय? काल पर्यंत म्हणत होते की मुंबई पोलिस स्कॉटलंड यार्ड पेक्षा चांगले आहेत. आज पाकिस्तान पेक्षा वाईट?

सम्राट यांनी म्हटले आहे की, विरोधक सरकार पडत असते तर चालले असते पण राजकारण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस यांच्यावर खुद्द गृहमंत्री आरोप करत आहेत हे कितपत योग्य आहे? महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्र पोलीसांवर कोणत्या आरोप करत आहेत हे कळतय का?

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here