म्हणून देश अडकतोय कर्जाच्या खाईत; पहा किती झालाय कर्जाचा डोंगर

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच म्हटले होते की माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात देश रसातळाला गेला. मात्र, त्याच्याच दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशावरील कर्जाचा डोंगर बेसुमार वाढल्याचे स्पष्ट झालेले आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार जून 2020 च्या तिमाहीत अखेरपर्यंत सरकारचे कर्ज वाढून तब्बल 101.3 लाख कोटींपर्यंत गेले आहे. अगोदरच नोटबंदी आणि मग जीएसटी या दोन्ही मुद्द्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची वाट लागली होती. त्यात कोरोना संकट आल्यावर भारतात लॉकडाऊन करण्यात आल्याने अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यानंतर सातत्याने कर्जात वाढ होत गेली आहे. हा डोंगर आणखी वेगाने फोफावण्याची शक्यता आहे.

31 मार्च 2020 पर्यंत सरकारवर 94.3 लाख कोटींचे कर्ज होते. एप्रिल ते जून या तीन महिन्यात 7 लाख कोटींवर कर्जाची भर पडली. त्यामुळे जून अखेर कर्जाचा आकडा 101. 3 लाख कोटींवर गेला आहे. जीडीपीच्या 43टक्के इतके हे सरकारवर कर्ज आहे.कर्जाचा भार कमी करण्यासाठी सरकारने जूनच्या तिमाहीत 346000 कोटींचे कर्ज रोखे जारी केले होते. मात्र कर्जाचा डोंगर कमी झालेला नाही. दरम्यान, गेल्यावर्षी जून 2019 पर्यंत सरकारवर 88.18 लाख कोटींचे कर्ज होते, असे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here