आज ठरणार देशातील शेतकऱ्यांचे भविष्य; राज्यसभेत मांडले जाणार कृषी सुधारणा विधेयक

शेतकऱ्यांना मार्केटिंग स्वातंत्र्य देणारे क्रांतिकारी विधेयक असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने कृषी सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी कंबर कसली आहे. रविवारी यावर चर्चा होऊन राज्यसभेत यावर मतदान होणार आहे. त्याद्वारे देशातील शेतकऱ्यांचे भविष्य ठरणार आहे.

हे विधेयक म्हणजे दिसायला, पाहायला आणि ऐकायला गोड वाटत असले तरी यामुळे भारतीय शेतकरी हा पूर्णपणे मोठ्या कंपन्यांच्या काह्यात जाण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. यातील काही चांगले मुद्दे सांगून सरकार देशाची दिशाभूल करीत असल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी मोदिजींनी हे विधेयक म्हणजे एक महत्वाचा शेतकरी हिताचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. एकूणच दोन्ही बाजूने आपापले मुद्दे रेटले जात आहेत.

अशावेळी राज्यसभेत या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याची घोषणा अकाली दल आणि तेलंगाना राष्ट्र समिती या भाजप मित्रांनी केली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. सध्या विरोधात 102 खासदार मतदान करणार आहेत. तर, भाजपच्या बाजूने मतदान करणाऱ्यांची संख्या १०४ आहे. अशावेळी विसेक खासदार कोविड १९ आजारामुळे अनुपस्थित राहणार आहेत. परिणामी यासाठी कोणाला किती खासदार कमी पडतात हे उद्याच समजणार आहे.

आतापर्यंत कोणत्याही विरोधाला न डावलता संख्याबळ जुळवण्यात मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी यश मिळवले आहे. मात्र, हा शेतकऱ्यांच्या भविष्याचा निर्णय असल्याने यावरील विरोध वाढत आहे. अशावेळी आताही भाजप संख्याबळ जुळवणार की यासाठी वेगळ्या मार्गाने जाणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. एकूण मोदी-शाह यांची ताकद आणि नीती लक्षात घेता ते थेट मतदान घेऊन हे विधेयक मंजूर करती असेच म्हटले जात आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here